Tuesday, September 5, 2023

मराठा आरक्षण लढ्याची एक आठवण!


महाराष्ट्र राज्याचे तात्कालिन मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष माननीय अ‍ॅड. शशिकांत पवार साहेब यांनी प्रलंबित असलेल्या मराठांच्या आरक्षणावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याबाबत मंत्रालयात भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी मराठा महासंघाचे मुंबई अध्यक्ष श्री. अभिजित राणे, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आणि मराठा समाजाचे अनुभवी, व्यासंगी, लोकप्रिय, रोखठोक व्यक्तिमत्व असणारे सन्मानिय श्री. मोहन सावंत, तसेच मराठा महासंघाचे पदाधिकारी श्री. योगेश पवार, श्री. विरेंद्र पवार उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष माननीय अ‍ॅड. शशिकांत पवार आणि श्री. मोहन सावंत यांनी मराठा आरक्षण मिळणे का महत्वाचे आहे? संदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे तात्कालिन मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासन सदैव सकारात्मक भूमिका घेण्याचे मान्य केले होते.

No comments:

Post a Comment

संपादकीय- प्रामाणिक-कार्यक्षम नेतृत्वाची गरुड झेप!

https://starvrutta.com/editorial-eagle-leap-of-honest-effective-leadership/ संपादकीय- प्रामाणिक-कार्यक्षम नेतृत्वाची गरुड झेप! रिपब्लिकन पार...