महिला भगिनींच्या सुश्राव्य भजनाला शुभेच्छा!
ओम साईधाम देवालयात उद्या सायंकाळी आमच्या महिला भगिनींचे सुश्राव्य भजन सादर होणार आहे. त्यावेळेस आपण सर्वजण उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहित करायचे आहे.
त्या परमात्म्याला नेहमीच आवडते ते भजन!
भजन म्हणजे काय? देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे आणि सेवाधर्म पाळणे.
हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे.
ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे.
पूर्वीच्या संतपरंपरेतील श्री संत ज्ञानेश्वर,तुकाराम,सोपान,निवृत्ती,एकनाथ, नामदेव, चोखामेळा इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केली आणि सेवाही केली.
भजन संस्कृत शब्द, दोन शब्दांनी तयार झालेला. भज-सेवा-याम् म्हणजे त्या परमात्म्याला भजायचं (भक्ती) आणि (दिनदुबळ्यांची) सेवा करायची. भक्तीच्या रथाची ही दोन चाके आहेत भक्ती आणि सेवा! दोन्ही चाके जेव्हा व्यवस्थित चालतात तेव्हा भक्तीचा रथ परमात्म्याकडे जातो.
अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक॥ असं संत ज्ञानेश्वर सांगतात. हा सेवाभाव संतांनी परमात्म्याला भजताना राखला. आपणही ओम साईधाम देवालय समितीच्या माध्यमातून त्या परमात्म्याची भक्ती करू म्हणजेच नामस्मरण करू आणि दिनदुबळ्यांची -गरजूंची सेवाही करू!
महिला भगिनींच्या सुश्राव्य भजन कार्यक्रमाला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
-मोहनसिंह सावंत
----------------------------------
साईधाम महिला मंडळाचे भजन आणि श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने केलेले आदरतीर्थ्य अविस्मरणीय!
👌👌👌👌👌👌
ओम साईधाम महिला मंडळाचे श्री शांता दुर्गा देवी मंदिर (मोतीलाल नगर-१, गोरेगाव पश्चिम, मुंबई) येथे झालेले सुश्राव्य भजन आणि श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने केलेले आदरतीर्थ्य अविस्मरणीय होते. त्यासाठी हा लेखन प्रपंच!
🙏🌺🌺🌺🌺🌺🙏
-मोहन सावंत
(संपूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा!)
🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment