Thursday, August 31, 2023

साईधाम महिला मंडळाचे भजन आणि श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने केलेले आदरतीर्थ्य अविस्मरणीय!

महिला भगिनींच्या सुश्राव्य भजनाला शुभेच्छा!

ओम साईधाम देवालयात उद्या सायंकाळी आमच्या महिला भगिनींचे सुश्राव्य भजन सादर होणार आहे. त्यावेळेस आपण सर्वजण उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहित करायचे आहे. 

त्या परमात्म्याला नेहमीच आवडते ते भजन!

भजन म्हणजे काय? देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे आणि सेवाधर्म पाळणे. 

हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. 

ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे.

पूर्वीच्या संतपरंपरेतील श्री संत ज्ञानेश्वर,तुकाराम,सोपान,निवृत्ती,एकनाथ, नामदेव, चोखामेळा इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केली आणि सेवाही केली.

भजन संस्कृत शब्द, दोन शब्दांनी तयार झालेला. भज-सेवा-याम् म्हणजे त्या परमात्म्याला भजायचं (भक्ती) आणि (दिनदुबळ्यांची) सेवा करायची. भक्तीच्या रथाची ही दोन चाके आहेत भक्ती आणि सेवा! दोन्ही चाके जेव्हा व्यवस्थित चालतात तेव्हा भक्तीचा रथ परमात्म्याकडे जातो.  

अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक॥ असं संत ज्ञानेश्वर सांगतात. हा सेवाभाव संतांनी परमात्म्याला भजताना राखला. आपणही ओम साईधाम देवालय समितीच्या माध्यमातून त्या परमात्म्याची भक्ती करू म्हणजेच नामस्मरण करू आणि दिनदुबळ्यांची -गरजूंची सेवाही करू!      

महिला भगिनींच्या सुश्राव्य भजन कार्यक्रमाला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

-मोहनसिंह सावंत

----------------------------------

https://starvrutta.com/editorial-bhajans-by-saidham-mahila-mandal-and-pilgrimage-by-shree-shanta-durga-devi-mandir-trust-are-unforgettable/

साईधाम महिला मंडळाचे भजन आणि श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने केलेले आदरतीर्थ्य अविस्मरणीय!

👌👌👌👌👌👌

ओम साईधाम महिला मंडळाचे श्री शांता दुर्गा देवी मंदिर (मोतीलाल नगर-१, गोरेगाव पश्चिम, मुंबई) येथे झालेले सुश्राव्य भजन आणि श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने केलेले आदरतीर्थ्य अविस्मरणीय होते. त्यासाठी हा लेखन प्रपंच! 

🙏🌺🌺🌺🌺🌺🙏

-मोहन सावंत

(संपूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा!)

🙏🙏🙏🙏🙏🙏

https://youtu.be/JCijoC01lto?si=tP2TkFETT0kd0e4

Saturday, August 26, 2023

ममतेची आभाळमाया...!

https://www.youtube.com/watch?v=WuXctAmL7WU

ममतेची आभाळमाया...!

आई, माता.... त्या मातेचे वात्सल्य... त्या मातेचं मातृत्व...  त्या मातेचा आपल्याच पुत्राविषयी कळवळा नसतो तर तो भारतातील सैनिकांविषयी सुद्धा प्रवाहित राहतो... अशा मातेला पाक्षिक `स्टार वृत्त'चा लाख सलाम! आपल्या लेकरांविषयी एका आईच्या भावना आणि सैनिकांचे अंतःकरण समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ प्रत्येक आईबापाने आईबापाच्या मुलांनी पाहायला पाहिजे, ऐकायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे! त्यावर आपल्या अंतर्मनात मनन चिंतन व्हायला पाहिजे आणि ह्या चिंतनातून जे प्रवाहित होईल ते मुक्त असेल, समर्थ असेल, पवित्र असेल, उपयुक्त असेल सर्वाथाने! 

🙏 -मोहन सावंत 🙏

सहसंपादक - पाक्षिक स्टार वृत्त 

https://starvrutta.com/


(कारगिल युद्धानंतर २००४ साली, कुटुंबासह सुट्टीत फिरायला कारगिलला गेलेल्या अनुराधाताईंना तिथली एकंदर परिस्थिती पाहून आणि तिथल्या सैनिकांबरोबर झालेल्या संभाषणातून भारतीय सैन्याबद्दलचा एक नवाच दृष्टिकोन गवसला आणि त्यांनी त्यांचे पुढचे आयुष्य त्याविषयीच्या कार्याला समर्पित करण्याची प्रतिज्ञा केली. सामान्य माणसांच्या मनात भारतीय सैन्याबद्दल जागृती निर्माण करणे आणि त्यांच्या कार्याची महती समस्त भारतीयांपर्यत पोहोचवणे हा ध्यास घेऊन त्यांनी ‘लक्ष्य फाऊंडेशन’ची स्थापना केली. त्यांच्यात झालेल्या ह्या परिवर्तनाची गोष्ट ऐकूया, त्यांच्याच तोंडून!  

सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘हिन्दुस्तान फीड्स’ प्रस्तुत ‘स्वयं टॉक्स सातारा २०२२’ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.)

धन्यवाद!

Wednesday, August 23, 2023

एकाच कुटुंबातील ५ आयपीएस-आयएएस अधिकारी करताहेत देशसेवा!

https://starvrutta.com/editorial-efficient-and-honest-officer-nagpur-divisional-commissioner-vijayalakshmi-bidri-prasanna/

एकाच कुटुंबातील ५ आयपीएस-आयएएस अधिकारी करताहेत देशसेवा!

एकाच कुटुंबातील एकदोन नव्हेतर सहापैकी पाचजण आयपीएस-आयएएस अधिकारी असून अतिशय प्रामाणिकपणे देशाची सेवा करीत आहेत. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी ह्या यूपीएससीमध्ये देशातून टॉपर होत्या. २००१ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशातून टॉपर येणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण भारतीय महिला ठरल्या. गेल्या २० वर्षात त्यांनी आपल्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय देशाच्या विकासासाठी, देशातील सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरले आहेत.

(संपूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा!)

Monday, August 7, 2023

खासदार गजानन किर्तीकर साहेबांची. भेट



२३ जुलै २०२३ रोजी काल दुपारी सन्मा. खासदार गजानन किर्तीकर साहेबांची. भेट घेऊन कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोसिएशनच्या आवारातील रस्ते व फ्लोरिंगची दुरूस्ती करण्याची विनंती केली. आपल्या विनंतीस मान देऊन त्यांनी आपल्या खासदार फंडातून सदर काम करण्याचे आश्वासन दिले. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य लवकरच पूर्णत्वास जाईल. माननिय खासदार गजानन किर्तीकर साहेबांचे मनःपूर्वक आभार!  -मोहन सावंत 

सेक्रेटरी- कॉस्मोपॉलिटन को-ऑप.  हाऊसिंग सोसायटी असोसिएशन

3













 

2

 



1





 

संपादकीय- प्रामाणिक-कार्यक्षम नेतृत्वाची गरुड झेप!

https://starvrutta.com/editorial-eagle-leap-of-honest-effective-leadership/ संपादकीय- प्रामाणिक-कार्यक्षम नेतृत्वाची गरुड झेप! रिपब्लिकन पार...