Saturday, September 30, 2023

मान्यवरांचे आगमन आणि संवाद!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
🙏 आग्रहाचे निमंत्रण... 🙏
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या निवासस्थानी दिनांक मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ ते २३ सप्टेंबर २०२३ ( पाच दिवस )श्री गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच गुरुवार दि. २१ सप्टेंबर २०२३ रोजी श्री. सत्यनारायणाची महापूजा आहे. तरी आपण दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा; ही आग्रहाची विनंती!
आपले नम्र...
श्री. मोहनसिंह सावंत
श्री. किसन सावंत
निवासस्थान- ओशिवरा ऑर्चिड को- ऑप. हौसिंग सोसायटी, इमारत क्रमांक १ ए/ ५०३, पाटलीपुत्र नगर, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-१०२
संपर्क-  9930175008/ 9869105471
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


आमंत्रणाचा मान देत मुंबई महापालिका आरोग्य समितीच्या माजी अध्यक्षा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यसम्राट मा. नगरसेविका राजूलताई पटेल कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोशिएशनचे (पाटलीपुत्र नगर, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई) सेक्रेटरी श्री. मोहन सावंत यांच्या निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आणि श्रीसत्यनारायण महापूजेनिमित्त उपस्थित राहिल्या. त्यावेळी सोसायटीमधील रहिवासी बहुसंख्येने उपस्थित राहून श्रीमती राजूलताई पटेल यांच स्वागत केले. यावेळी सोसायटीमधील मान्यवर मुस्लिम बांधवही उपस्थित होते. 

मा. नगरसेविका राजूलताई पटेल यांनी उपस्थितांशी संवाद साधला. तर डॉ. सानिका मोहन सावंत आणि डॉ. सानिका गोस्वामी यांच्याशी वैद्यकीय सेवेबाबत चर्चा केली.























Tuesday, September 19, 2023

कॉस्मोपॉलिटन असोशिएशन उत्सव मंडळाचे श्री गणेश दर्शन

Ganesh Darshan 2022 


कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हौसिंग सोसायटी असोशिएशन उत्सव मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन आणि श्री गणेश भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सभासद...   


कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोसिएशनच्या सर्व सदस्यांना, रहिवासी बंधुभगिनिंना कळविण्यात येते की, आज सकाळी ११.०० वाजता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपतीच्या मंडपात आपल्या सोसायटीमधील मुस्लिम बांधव श्री गजाननाच्या भेटीसाठी व श्री गणेश भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. तेव्हा आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. कृपया वेळेवर उपस्थित राहावे, ही विनंती!

🙏 -आपले स्नेहांकित 🙏

कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोसिएशन उत्सव मंडळ

All the members of the Cosmopolitan Co-op. Housing Society Association, the resident brothers and sisters are informed that today at 11:00 am like every year, the Muslim brothers of our society will come to the Ganpati Mandap to meet Shri Gajanana and wish the Shri Ganesha devotees.  All of us are requested to be present then.  Please be on time, this humble request!

Your lovingly 

Cosmopolitan Co-op.  Housing Society Association Utsav Mandal










Tuesday, September 5, 2023

मराठा आरक्षण लढ्याची एक आठवण!


महाराष्ट्र राज्याचे तात्कालिन मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष माननीय अ‍ॅड. शशिकांत पवार साहेब यांनी प्रलंबित असलेल्या मराठांच्या आरक्षणावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याबाबत मंत्रालयात भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी मराठा महासंघाचे मुंबई अध्यक्ष श्री. अभिजित राणे, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आणि मराठा समाजाचे अनुभवी, व्यासंगी, लोकप्रिय, रोखठोक व्यक्तिमत्व असणारे सन्मानिय श्री. मोहन सावंत, तसेच मराठा महासंघाचे पदाधिकारी श्री. योगेश पवार, श्री. विरेंद्र पवार उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष माननीय अ‍ॅड. शशिकांत पवार आणि श्री. मोहन सावंत यांनी मराठा आरक्षण मिळणे का महत्वाचे आहे? संदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे तात्कालिन मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासन सदैव सकारात्मक भूमिका घेण्याचे मान्य केले होते.

संपादकीय- प्रामाणिक-कार्यक्षम नेतृत्वाची गरुड झेप!

https://starvrutta.com/editorial-eagle-leap-of-honest-effective-leadership/ संपादकीय- प्रामाणिक-कार्यक्षम नेतृत्वाची गरुड झेप! रिपब्लिकन पार...